शासन निर्णय
महाराष्ट्रातील नाभिक समाजासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली दि.१३/०९/२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेले “महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळ ” अधिक्रमीत करुन राज्यातील इतर मागास प्रवर्गात समाविष्ट असलेल्या नाभिक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळा अंतर्गत संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यास शासन मान्यता देत आहे.सदर उपकंपनीचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून चालविण्यात येईल.