रु.1.00 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना
- शासनाकडून प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलातून ही योजना राबविण्यात येते.
- अर्जदार नाभिक प्रवर्गातील असावा त्याचे वय 18 ते 55 वर्षे असावे व तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाखापेक्षा जास्त नसावे (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार)
- एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- रु.1.00 लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्ध होईल.
- लाभार्थीचा सहभाग निरंक असेल.
- 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मूळ रु.2,085/- नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थिना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.से. 4% व्याज आकारण्यात येईल.
थेट कर्ज योजना अर्ज [पीडीएफ – 6 एमबी]
लाभार्थी:
--
फायदे:
--
अर्ज कसा करावा
संबंधीत जिल्हा कार्यालयाशी संपर्क करून फॉर्म सादर करावा.